घरदेश-विदेशवहीतून ड्रग्स लपवून आणणाऱ्या शिक्षकाला अटक

वहीतून ड्रग्स लपवून आणणाऱ्या शिक्षकाला अटक

Subscribe

बंगळुरू येथील एका महाविद्यालयातील शिक्षकाला ड्रग्स (अम्ली पदार्थ) बाळगण्याच्या प्रकरणी अटक केली आहे. या शिक्षकाने वहीमध्ये हे ड्रग्स लपवले होते.

बंगळुरू येथील एका खासगी महाविद्यालयात अम्लीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या महाविद्यालयातील शिक्षकाकडे हा साठा सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला अटक केली आहे. मुख्यतः हा साठा एका वहीमध्ये साठवण्यात आला होता. अटक शिक्षक २७ वर्षीय सिव्हिल इंजिनियरिंग मधील एम. टेक आणि बेंगलुरू महाविद्यालयातील सहायक व्याख्याता आहे. १६ ग्रॅमच्या ड्रग्सची तस्करी करत असताना त्याला अटक करण्यात आली. हे ड्रग्स मुंबईहून एका कुरीअरच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. पोलिसांनी या शिक्षकाला अटक केल्यानंतर त्याच्या जवळून ६० हजार रुपये किमतीचे ड्रग्स मिळाले आहेत. मुंबईतून सुरु असलेल्या ड्रग माफीयांचाही यामध्ये हात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

अम्ली पदार्थांचा व्यसनी शिक्षक

अम्ली पदार्थांची तस्करी करणारा हा शिक्षक पूर्वी व्यसनी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही काळ व्यसन केल्यानंतर त्याने अम्ली पदार्थांची तस्करी सुरु केली. मुख्यतः हे ड्रग्स रस्त्यावर विकल्या जाते. यामध्ये हा शिक्षकही सामील असल्याचे सांगण्यात आले आहे. ड्रग्स विकण्यासाठी हे डिलर सोशल मीडियाचा वापर करतात. फेसबुकवर विविध नावांनी याशिक्षकाचे फेक अकाऊंट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -