खुशखबर! भारतात कोरोनावर पहिली लस आली; जुलैपासून मानवी चाचणी

भारतात कोरोनावर लस तयार झाली असून बायोटेकने ही लस बनवली आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या लसीला मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.

Hyderabad
bharat biotech developed india's first covid vaccine

जगभरात कोरोना विषाणूने कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण पाच लाखावर गेले आहे. यामुळे परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी आहे. भारतात कोरोनावर लस तयार झाली असून बायोटेकने ही लस बनवली आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या लसीला मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे.

कंपनीने केलेला दावा

भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे कोरोनावरील ही लस फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

याआधी कंपनीने काढलेल्या लस

भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत.

करोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही करोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३) ही लस बनवण्यात आली आहे.

कंपनीने प्री-क्लिनिकल स्टडी आणि इम्यून रेस्पॉन्सचा अहवाल सरकारला सादर केला आहे. यानंतर डीसीजीआय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या लसीच्या फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीला परवानगी दिलीय. यामुळे देशभरात जुलै महिन्यापासून या लसीची चाचणी सुरू होणार आहे.

ही लस बनवण्यात आयसीएमआर आणि एनआयव्हीने मोठी भूमिका बजावली आहे. तर डीसीजीआयने मानवी चाचणीची मंजुरी देऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिसर्च अँड डेव्हलप टीमच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. आम्ही हे काम सार्थक करू शकलो, असे भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, २ दहशतवादी ठार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here