भीम अॅप्लिकेशनवर १ ऑगस्टपासून ‘कॅशबॅक’ बंद!

आपण रोज भीम एप्लिकेशन वापरतो.अनेकदा स्वतः स्वतःलाच पैसे पाठवतो.पण आता असे पैसे पाठवणं लवकरच बंद होणार आहे.

Bhim app

भीम एप्लिकेशन ३० डिसेंबर २०१६ रोजी लाँच करण्यात आले.भीम एप्लिकेशनद्वारे आपण पैसे पाठवू शकतो किंवा दुसऱ्याने पाठवलेले पैसे घेऊ शकतो. यामुळे पैसे पाठवणे सोयीचे झाले आहे. क्यू आर कोडचा वापर करून किंवा फोन नंबर टाकून पैसे पाठवता येतात. पण आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्वत:च्याच अकाऊंटला पैसे पाठवण्यावर निर्बंध आणणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून आपण भीम एप्लिकेशनवरून स्वतःलाच पैसे पाठवू शकणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकेलासुद्धा या प्रकारचे आदेश दिले आहेत. या प्रकारचे व्यवहार कॅशबॅकसाठी केले जातात. अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर केल्यास काही रक्कम कॅशबॅक म्हणून पुन्हा मिळते. या कॅशबॅकच्या ऑफर्स खाजगी नॉन-बँकिंग संस्थांकडून दिल्या जातात. मात्र, यावर आळा घालण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

कशी मिळवली जाते ‘कॅशबॅक’?

अशा प्रकारे स्वत:च्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून कॅशबॅक मिळवण्याच्या प्रकरणांमध्ये जून महिन्यात ३० टक्के वाढ झाली तर UPI ने होणारे व्यवहार २४६.३७ दशलक्ष व्यवहारांपर्यंत पोहोचले. नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया आता त्याच खात्यातील व्यवहार रोखून या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहे. NPCIने बँकांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या व्यवहारामध्ये ज्याचे देयक व प्राप्तकर्ता खाते समान आहेत ते 1 ऑगस्टपासून बंद राहील. एनपीसीआयच्या पाहणीत अशी काही उदाहरणे आली आहेत, ज्यात दोन्ही क्रेडिट आणि डेबिट खाते समान आहेत. ग्राहक त्यांच्या खात्यातून त्याच खात्यात पैसे पाठवतात.

मग हे व्यवहार कसे करायचे?

याचे स्पष्टीकरण करण्यासाठी एनपीसीआयने म्हटले आहे की, ‘एकाच यूपीआय अकाउंट्समध्ये किंवा काही प्रकरणांमध्ये, आयडी ते अकाउंट नंबरवर व्यवहार होत आहे. परंतु मूळ खाते समान आहे. वापरकर्त्यांना अशा व्यवहाराची एक तिसरी पद्धत आहे. एका अन्य ID ला ते पैसे पाठवू शकतात. पण तो ID त्याच बँक खात्याशी जोडलेला असावा.