घरदेश-विदेशरवी किशन निवडणुकीच्या रिंगणात; गोरखपूरमधून मिळाली उमेदवारी

रवी किशन निवडणुकीच्या रिंगणात; गोरखपूरमधून मिळाली उमेदवारी

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वास्तव असलेल्या गोरखपूर मतदारसंघात भाजपाने भोजपूरी सुपरस्टार रवी किशन याला उमेदवारी दिली आहे.

भाजपाने उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी आज, सोमवारी उमेदवारांची घोषणा केली आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वास्तव असलेल्या गोरखपूर मतदारसंघात भाजपाने भोजपूरी सुपरस्टार रवी किशन याला उमेदवारी दिली आहे. तर नुकताच भाजपात प्रवेश करणारे गोरखपूर येथील खासदार प्रवीण निषाद यांना संत कबीरनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या आठ उमेदवारांमध्ये प्रतापगड येथून संगम लाग गुप्ता, आंबेडकरनगर येथून मुक्त बिहारी, संत कबीरनगर येथून प्रवीण निषाद, गोरखपूर येथून रवी किशन, देवरिया येथून रमापती राम त्रिपाठी, जौनपूर येथून के. पी. सिंह आणि भदोही येथून रमेश बिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

निरहुआनंतर रवी किशनदेखील भाजपमध्ये 

गोरखपूरमधून पुन्हा एकदा ब्राह्मण कार्ड खेळत रवी किशनला उमेदवारी दिली आहे. दरम्यान, निरहुआ नंतर भाजपने रवी किशनच्या रूपाने आणखी एका भोजपुरी अभिनेत्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. निरहुआ यांना आजमगड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गोरखपूरमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देणारे आणि सपाला रामराम करून नुकताच भाजपमध्ये प्रवेश करणारे विद्यमान खासदार प्रवीण निषाद यांना संत कबीर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -