घरताज्या घडामोडीजय श्रीराम! ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

जय श्रीराम! ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

Subscribe

अयोध्येतील राम मंदिर (ayodhya ram mandir) निर्मितीबाबत काल येथील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराची पायाभरणी कधी करावी यावर चर्चा करण्यात आली होती. (PMO) पंतप्रधान कार्यालयाला ट्रस्टकडून ३ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट अशा पायाभरणीसाठीच्या दोन तारखा पाठवण्यात आल्या आहेत. या दोन तारखांपैकी कोणत्या तारखेला मंदिराची पायाभरणी करावी. याबाबतचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने आज निर्णय घेतला आहे. ५ ऑगस्टला अयोध्येतल्या राम मंदिराचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

कालच्या बैठकीत मंदिराची उंची आणि निर्मितीच्या व्यवस्थेवरदेखील चर्चा करण्यात आली. या बैठकीत अयोध्या सर्कीट हाऊसमध्ये दुपारी ३ वाजता ही बैठक सुरू झाली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. यावेळी राम मंदिराच्या आराखड्यातही बदल केले जाणार असल्याचे ठरवण्यात आले. जुन्या आराखड्यानुसार या मंदिराला ३ घुमट होते. मात्र आता या मंदिराला एकूण ५ घुमट असावेत, असे बैठकीत ठरवण्यात आले. देशभरातील कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानंतर फंड उभाण्यात येईल, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील तीन ते साडेतीन वर्षात राम मंदिराचे काम पूर्ण होईल, असा विश्वास चंपत राय यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आलेली आहेत. यामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. काल झालेल्या बैठकीत राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह अकरा सदस्यांची उपस्थिती होती. उर्वरित चार सदस्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देऊन अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला. २.७७ एकर वादग्रस्त जमिन राम मंदिरासाठी आणि मशिदीच्या बांधकामासाठी पर्यायी पाच एकर जागा देण्यााचे निर्देश केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे सुमारे सात दशके सुरू असलेला अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदेचा वाद कायमचा संपुष्टात आला. सरन्यायाधीश गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. ए. नझीर यांच्या घटनात्मक खंडपीठाने १ हजार ४५ पानांचा हा ऐतिहासिक निकाल एकमताने दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: जगातील कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ६ लाखांचा टप्पा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -