घरदेश-विदेशधार्मिक स्थळाच्या ठिकाणी सॅनिटायझर लावण्यास पुजाऱ्यानेच केला विरोध!

धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सॅनिटायझर लावण्यास पुजाऱ्यानेच केला विरोध!

Subscribe

भोपाळमधील एक मंदिर पुजारीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांच्या विरोधात

अडीच महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केली. या घोषणेनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानुसार येत्या ८ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून देशभरात कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

१ जूनपासून अंमलात आलेल्या पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनला अनलॉक १ असे नाव देण्यात आले. आतापर्यंत बंद केलेली धार्मिक स्थळं ८ जूनपासून उघडण्यात येणार असली तरी त्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी एक मार्गदर्शक नियम देखील जाहीर केले. मात्र आता या मार्गदर्शक तत्त्वांना विरोधही सुरू झाला आहे. दरम्यान भोपाळमधील एक मंदिर पुजारीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांच्या विरोधात असल्याचे समोर आले आहे. भोपाळच्या माँ वैष्णोदेवी धाम नव दुर्गा मंदिराचे पुजारी म्हणाले की, प्रशासनाचे कार्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे आहे, परंतु मी मंदिरांमध्ये असणाऱ्या सॅनिटायझर मशीनच्या विरोधात आहे कारण त्यात अल्कोहोल असते.

- Advertisement -

पुजारी चंद्रशेखर तिवारी म्हणाले, ‘ज्यावेळी आपण मद्यपान करून मंदिरात प्रवेश करू शकत नाही, तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात स्वच्छ करून मंदिरात कसा प्रवेश करू शकतो. सर्व मंदिरांच्या बाहेर हात धुण्याचे यंत्र ठेवा, तिथे साबण ठेवा आणि आम्ही ते स्वीकारतो, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
सोमवारपासून धार्मिक स्थळात प्रवेश, असे असतील नियम!

१. मंदिरात प्रवेश करताना हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग आवश्यक
२. फक्त मास्क किंवा फेस कव्हर घातलेल्या लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल
३. मंदिरातील मूर्ती किंवा ग्रंथांना प्रवेश करण्याची परवानगी नसेल. शिवाय दर्शनाच्या रांगेत उभं राहाताना किमान ६ फुटांचं अंतर असायला हवं
४. मंदिर आवारात कोरोनाविषयी जनजागृती करणारे पोस्टर्स लावले जावेत. शिवाय, अशी जनजागृती करणाऱ्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप नियमितपणे चालवाव्यात
५. मंदिर आवार, पार्किंग अशा ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जावं
६. मंदिर परिसरात दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं. यासाठी मंदिर प्रशासनाने देखील विशिष्ट चिन्ह किंवा तत्सम उपाययोजना कराव्यात
७. मंदिर परिसरात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं जावं
८. मंदिर किंवा धार्मिक स्थळांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांचा रस्ता वेगवेगळा असायला हवा
९. मंदिर परिसर किंवा धार्मिक स्थळांवर सातत्याने सॅनिटायझेशन केलं जावं
१०. फरशी किंवा जमीन दिवसातून अनेकदा स्वच्छ केली जावी
११. मास्क, फेस कव्हर आणि हँड ग्लोव्ह्जची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जावी
१२. एसीमधील तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे. त्याव्यतिरिक्त ताजी हवा आणि क्रॉस व्हेंटिलेशनची पुरेशा प्रमाणात सोय असावी
१३. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जावं. उदा. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवणे, २० सेकंद साबणाने हात धुणे, थुंकण्यावर सक्त मनाई, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे इ.


Unlock 1.0 : सोमवारपासून धार्मिक स्थळं उघडणार, असे असतील नियम!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -