घरCORONA UPDATECoronavirus - करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना दिलासा!

Coronavirus – करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना दिलासा!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आर्थिक संकटांचा सामना करत असताना केंद्रसरकाने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या पत्रकारपरिशदेनंतर सेन्सेकने ११०० अंकांनी उसळी घेतली आहे. करोनामुळे देशावर मोठे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे काही क्षेत्रांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काही मोठ्या घेषणा केल्या

- Advertisement -

आधार- पॅन लिंक कण्याची मुदती ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आयकर परतावा भरण्याची मुदतही वाढ करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत नागरिक आयकर परतावा करू शकणार आहेत. त्याचप्रमाणे आयटीआय भरण्याच्या मुदतीतही वाढ कण्यात आल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे उशीरा कर भरणाऱ्यांनाही आता १२ ऐवजी ९ टक्केच दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

मार्च, एप्रिल, मेचा जीएसटी भरणा ३० जून पर्यंत करता येणार आहे. ‘विवाद से विश्वास’  योजनेची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर ५ कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न फाइल करण्यासाठी उशीर झाल्यास दंड आकारण्यात येणार नाही. कॉर्पोरेट्सच्या संचालक मंडळाच्या बैठका ६० दिवसांसाठी पुढे ढकलता येतील. टीडीएसवरचा व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -