घरदेश-विदेशJEE मेनच्या विद्यार्थ्यांना दिलासा, NIT-IIT प्रवेशासाठी ७५% टक्के गुणांची पात्रता रद्द

JEE मेनच्या विद्यार्थ्यांना दिलासा, NIT-IIT प्रवेशासाठी ७५% टक्के गुणांची पात्रता रद्द

Subscribe

अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही

जेईई मेनची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी जेईई मेनसाठी १२ वीला ७५% गुणांचा पात्रता नियम रद्द करण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने ही सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी ट्विट करून अधिकृत घोषणा केली आहे. निशंक यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आयआयटी जेईई (एडवांस्ड) आणि मागील शैक्षणिक वर्षात घेतलेला निर्णय लक्षात घेऊन पुढील शैक्षणिक सत्राच्या जेईई मेनसाठी १२ वी मधील ७५% गुणांसाठीचा पात्रता नियम काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NIT, IIIT आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमध्ये बीटेक, बीई अभ्यासक्रम प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात येते.

पुर्वी ७५ टक्के गुण होते आवश्यक

देशात कोरोना परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर २०२० मध्ये जेईई एडवांस्ड मेरिट नियमांनुसार आयआयटीच्या प्रवेशासाठी किमान १२ वीमध्ये किमान ७५ टक्के किंवा परीक्षा पात्रतेच्या क्रमवारीत अव्वल २० टक्के गुण असणे आवश्यक होते. पण आता ही मर्यादा सलग दुसर्‍या वर्षी हटविण्यात आली आहे.

- Advertisement -

अभ्यासक्रमात बदल नाही

जेईई-नीटच्या (JEE- NEET) अभ्यासक्रमासंदर्भात शिक्षणमंत्री म्हणाले की, मागील वर्षाप्रमाणेच परीक्षेचा अभ्यासक्रम कायम राहील त्यात कोणताही बदल होणार नाही. जेईई-नीटमध्ये मर्यादित प्रश्नांची उत्तरे देण्यास उमेदवारांना पर्याय देण्यात येईल. जेईई मेन २०२१ अभ्यासक्रम मागील वर्षाप्रमाणेच राहील. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत ९० पैकी ७५ प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय असेल. प्रश्नपत्रिकेतील ९० प्रश्नांपैकी ३०-३० प्रश्न गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि त्यातील ७५ प्रश्न असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -