घरताज्या घडामोडीBihar Election: पोलिसांना एका गाडीतून ८ नाण्यांनी पोती केली जप्त, मोजायला लागेल...

Bihar Election: पोलिसांना एका गाडीतून ८ नाण्यांनी पोती केली जप्त, मोजायला लागेल ७ तास

Subscribe

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी पटणा आणि बिहारमधील पोलीस-प्रशासन सज्ज झाले असून अनेक ठिकाणी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा प्रकारे हाजीपुरात नाकाबंदी आणि तपासणीदरम्यान पोलिसांना एका गाडीतून नाण्यांनी भरलेली ८ पोती जप्त केली आहेत.

वास्तविक, बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे नियमानुसार एका वेळी प्रचंड रोख रक्कम नेण्यास बंदी आहे. मतदरांना पैसे देऊन त्याचे मत घेण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी अवैध पद्धतीने लाखो-कोट्यावधी पैसे खर्च केले जातात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी सापडल्याने लोक आश्चर्यचकीत झाले आहेत.

- Advertisement -

हाजीपूर नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सोनपूर पूलजवळ नाकाबंदी केली होती. तपासादरम्यान पोलिसांना एका गाडीला थांबवले. त्यावेळेस गाडीत नाण्यांनी भरलेली पोती मिळाली. तसेच तपासदरम्यान नाण्यांसह अडीच लाख रोख रक्कम जप्त केली. प्रतिबंधित रक्कम पेक्षा जप्त करणारी रक्कम जात होती. त्यामुळे नाण्यांसह वाहनही पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर ठाण्यातील पोलीस पोत्यांमधील नाणी मोजायला बसले. तेव्हा ८ पोत्यातील नाणी मोजण्यासाठी ७ तास लागले. ८ पोत्यात १.३७ लाख रुपयांची नाणी होती. तर जप्त केलेली रोकड अडीच लाख इतकी होती.

नाण्यांची पोती पडकल्यानंतर जेव्हा जिल्ह्यातील एसपी मनीष कुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आधिकाधिक रोख रक्कम जप्त करण्याची मोहीम राबवली आहे. दरम्यान निवडणुकीत नाण्यांचे काय काम असेल? याबाबत एसपी म्हणाले की, आता यासंदर्भात चौकशी केली जाई आणि पुन्हा सांगितले जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – Bihar Election 2020: भाजपशी दोन हात करायला शिवसेनेची २० जणांची टीम तयार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -