‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री अडकले

जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची ओळख असलेल्या स्मारकात असलेली लिफ्ट अचानक बंद पडल्याने लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai
bihar Deputy Chief Minister stuck in statue of unity lift
स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री अडकले

जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या पुतळ्याची ओळख आहे. या पुतळ्याचे नुकतेच १५ दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आले. मात्र या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडल्याने बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी या लिफ्टमध्ये अडकल्याचे समोर आले आहे.

लिफ्ट झाली बंद

वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आले. हा आकर्षित आणि जगातील सर्वात उंच पुतळा पाह्यासाठी लोकांची एकच गर्दी दिसून येत होती. हा पुतळा पाण्यासाठी केवळ गुजरातमधूनच नव्हे तर इतर राज्यामधूनही लोक येत आहेत. हा पुतळा पाहण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी लिफ्टने व्हयूईंग गॅलरीत जात होते. त्यावेळी अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत असणारी इतर लोकही त्या लिफ्टमध्ये अडकली होती.

१ मिनिट लिफ्ट अडकली

लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्यामुळे लिफ्ट अडल्याचे सांगण्यात येत आहे. लिफ्टमधील काही लोक बाहेर पडल्यानंतर लिफ्ट पुन्हा सुरु झाली. मात्र ही लिफ्ट केवळ १ मिनिटासाठी अडकली असल्याची माहिती लिफ्ट ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या –

वाचा – तीन पिढ्यांनी साकारला जगातील सर्वात उंच पुतळा