घरदेश-विदेशBihar Election 2020 : नातेसंबंधांची निवडणूक! अनेक दिग्गजांचे नातेवाईक मैदानात!

Bihar Election 2020 : नातेसंबंधांची निवडणूक! अनेक दिग्गजांचे नातेवाईक मैदानात!

Subscribe

देशाच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज येणार असल्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष या निकालांकडे लागलं आहे. बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांचे निकाल येणार असून त्यासाठी तब्बल ३ हजार ७३७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गजांमुळे किंवा त्यांच्या नातेवाईकांमुळे ती निवडणूक हाय प्रोफाईल बनली आहे. बिहारच्या राजकारणात अनेक वर्ष काम केलेल्या दिग्गज नेतेमंडळींना आपल्या मुलाला, मुलीला किंवा परिवारातल्या सदस्यांना मैदानात उतरवलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा किंवा माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे नातेवाईक चंद्रिका राय किंवा माजी केंद्रीय मंत्री शरद यादव अशी काही नावं घेता येतील!

बांकीपूर मतदारसंघ – लव सिन्हा

- Advertisement -

बिहारच्या बांकीपूर मतदारसंघातली निवडणूक ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा यांच्यामुळे चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर लव सिन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांच्या समोर भाजपचे तीन वेळा आमदार राहिलेले नितीन नवीन आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे देखील याच मतदारसंघातून अनेकदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे लव सिन्हा यांच्यासाठी निवडणूक कठीण पेपर ठरला आहे.

हसनपूर मतदारसंघ – तेजप्रताप यादव

- Advertisement -

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या चारा घोटाळा प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्याच्या हसनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. २०१५ मध्ये त्यांनी महुआमधून निवडणूक लढवली होती. पण यावेळी त्यांनी मतदारसंघ बदलला आहे. त्यांच्यासमोर हसनपूरचे जदयूचे विद्यमान आमदार राजकुमार राय यांचं आव्हान आहे.

परसा मतदारसंघ – चंद्रिका राय

बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे पुत्र चंद्रिका राय हे देखील या निवडणुकीत परसा विधानसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजामावत आहेत. चंद्रिका राय हे लालूप्रसाद यादव यांचे व्याही देखील आहेत. चंद्रिका राय यांच्यासाठी त्यांची मुलगी ऐश्वर्या राय हिने देकील प्रचारसभा घेतल्या होत्या.

बिहारीगंज – सुभाषिनी यादव

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यादव माधेपुरीच्या बिहारीगंज विधानसभा मतदारसंघातून मैदानात आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या सुभाषिनी यादव यांच्यासमोर जदयूचे निरंजन कुमार मेहता यांचं तगडं आव्हान आहे. गेल्या दोन निवडणुका या मतदारसंघातून जदयूच्याच उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे सुभाषिनी यादव यांच्यासाठी ही कठीण परीक्षा ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -