घरदेश-विदेशBihar Election: गुप्तेश्वर पांडेंचा निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट; घेतला मोठा निर्णय

Bihar Election: गुप्तेश्वर पांडेंचा निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट; घेतला मोठा निर्णय

Subscribe

बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लगबगीनं स्वेच्छानिवृत्ती घेत JDU मध्ये प्रवेश करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. JDU कडून उमेदवारी मिळेल अशा भ्रमात असलेल्या गुप्तेश्वर पांडेंचा भ्रमनिरास झाला आहे. JDU ने पांडेंना उमेदवारी दिलेली नाही आहे. त्यामुळे पांडे यांचा राजकारण प्रवेशाचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला आहे. उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

JDU ने बुधवारी त्यांच्या कोट्यातील सर्व ११५ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही आहे. पांडे बक्सरमधून निवडणूक लढतील अशी चर्चा होती. परंतु, बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेल्याने भाजपने या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. गुप्तेश्वर पांडे यांनी एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

“आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे. माझी जन्मभूमी बक्सर आहे. तिथल्या सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असं गुप्तेश्वर पांडे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अपने अनेक शुभचिंतकों के फ़ोन से परेशान हूँ। मैं उनकी चिंता और परेशानी भी समझता हूँ। मेरे सेवामुक्त होने के बाद सबको…

Posted by Gupteshwar Pandey on Wednesday, 7 October 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -