घरदेश-विदेशBihar Election: नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार - भाजप

Bihar Election: नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार – भाजप

Subscribe

बिहारमध्ये NDA ची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरु आहे. मागिल निवडणूकीत ५३ जागा जिंकणार भाजप पक्ष या निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरताना दिसत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार का अशा चर्चा सुरु असताना बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयस्वाल यांनी नितीश कुमार यांनी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा केली आहे. बिहारमध्ये भाजपचा आकडा वाढत होता असे दिसत असताना असे वाटत होते की भाजप मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करेल. मात्र, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असे स्पष्ट केले आहे.

निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजप मुख्यमंत्री सोडेल का? हा कळीच मुद्दा होता. या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. सरकार स्थापना आणि नेतृत्वासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ असे विजयवर्गीय म्हणाले होते. मात्र, आता बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयस्वाल यांनी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा केली आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपने केली असली तरी भाजपचे वर्चस्व नितीश कुमार आणि जनता दलाला सहन करावे लागणार आहे. त्यामुळे आता भाजपबरोबर वर्चस्वाच्या लढाईत नितीश कुमार यांची फरफट होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -