Bihar Election: म्हशीवर बसून उमेदवार अर्ज भरायला निघाला; गावात फुकट प्रचार झाला

Bihar Election leader arrived on the buffalo to file his nomination papers for the bihar assembly elections
म्हशीवर बसून उमेदवार अर्ज भरायला निघाला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. राकीय नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यस्त आहेत. यादरम्यान, आमदार होण्याचं स्वप्न पाहणारा एक नेता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खास शैलीत उपविभाग कार्यालयात पोहोचला. यामुळे हे भावी आमदार चर्चेचा विषय बनले आहेत.

भावी आमदार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हशीवर बसून उपविभाग कार्यालयात दाखल झाले. पालीगंजमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. म्हशीवरुन अर्ज भरायला का गेलात? असं विचारलं तेव्हा भावी आमदाराने मी प्राणीप्रेमी आहे असं गर्वाने सांगितलं. जेव्हा लालूजी म्हशीच्या पाठीवर बसून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतात, तर मी किमान आमदार नक्कीच होईन, असं या भावी आमदाराने सांगितलं.

महायुतीच्या उमेदवारांसह आठ अपक्ष उमेदवारांनी अर्ज केला दाखल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या दिवशी पालीगंज उपविभाग कार्यालयात महाआघाडीचे उमेदवार आणि आठअपक्ष उमेदवारांनी निवडणूक अधिकारीसह एसडीओसमोर अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये, महायुतीच्या सीपीआय-एमएलचे उमेदवार संदीप सौरभ, लोकसेवा पक्षाचे राजगीर प्रसाद, इंडियन पीपल्स पार्टीचे रवीश कुमार, अपक्ष बसंत कुमार, जितेंद्र बिंद, हरे कृष्णा यांच्यासह पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे रवींद्र प्रसाद यांचा समावेश आहे.


हेही वाचा – रिकाम्या बोगद्यात हात दाखवणं बंद करा अन् जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या