घरदेश-विदेशBihar Election : ऐन निवडणुकीत नितीश कुमारांनी केली लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी

Bihar Election : ऐन निवडणुकीत नितीश कुमारांनी केली लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी

Subscribe

बिहारमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सत्ता टिकवण्याचे आव्हान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे आहे. दरम्यान नितीश कुमार यांनी आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छित आहेत. देशातील आरक्षणव्यवस्थेबद्दल एक महत्वाचे आणि गंभीर विधान नितीश कुमार यांनी प्रचारसभेत केले आहे. आरक्षण हे त्या त्या वर्गाच्या लोकसंख्येनुसारच मिळायला हवे, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. बिहारच्या वाल्मिकीनगर येथील प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले नितीश कुमार 

जनगणना हा विषय राज्याच्या हातात नाही, पण लोकसंख्येनुसार आरक्षण असायला हवे ही आपली इच्छा असल्याचे नितीश कुमार प्रचार सभेत म्हणाले. एखाद्या महत्वाच्या राजकीय नेत्याने जाहीर व्यासपीठावर अशी मागणी करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर नितीश कुमारांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला हात घातला आहे.

- Advertisement -

बिहार, महाराष्ट्र आणि ओडिशा या तीन राज्यांनी २०२१ ची जनगणना ही जातनिहाय व्हावी यासाठी विधानसभेत ठरावही मंजूर केले आहेत. नितीश कुमार यांचे ऐन निवडणुकीतील हे विधान त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. बिहारसारख्या राज्यात जिथे जातीय समीकरणं निवडणुकीत खूप प्रभाव टाकणारी ठरतात तिथे नितीश कुमारांनी खेळलेला हा डाव किती यशस्वी होतो हेही पाहावं लागेल.

हेही वाचा –

भावी १२ आमदारांची नावे लखोट्यात बंद!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -