Bihar Election: काँग्रेसच्या महाआघाडीकडून २४३ जागांवरील उमेदवारांची घोषणा

शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाला देखील संधी

Bihar Election: काँग्रेसच्या महाआघाडीकडून २४३ जागांवरील उमेदवारांची घोषणा

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २४३ जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जागावाटपाच्या सुत्रानुसार, राष्ट्रीय जनता दलाला १४४ जागा, काँग्रेसला ७० जागा आणि डाव्या पक्षांना २९ जागा मिळाल्या आहेत.

शत्रुघ्न सिन्हांच्या मुलालाही संधी

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची महाआघाडी आहे. हे सर्व पक्ष एकत्रितपणे भाजप आणि संयुक्त जनता दलाला आव्हान देणार आहे. याआधी काँग्रेसने आपल्या ४९ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यात बांकीपूर येथून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा यांना तिकिट देण्यात आले आहे. बिहारगंज येथून सुहासीनी यादव यांना तिकिट देण्यात आले आहे.

महाआघाडीसोबतच एनडीएने देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यानुसार जेडीयू १२२ आणि भाजप १२१ जागांवर निवडणूक पार पडणार आहे. तर यंदा बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील ३ नोव्हेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.


भयानक! PUBG वर मैत्री झालेल्या मित्रांनीच तिच्यावर सामुहिक बलात्कार केला!