घरCORONA UPDATELockDown: वडील - मुलीचा तो सायकल प्रवास; ट्रम्पच्या लेकीनेही केले कौतुक

LockDown: वडील – मुलीचा तो सायकल प्रवास; ट्रम्पच्या लेकीनेही केले कौतुक

Subscribe

बिहारमधील एका गावातील १५ वर्षीय ज्योती कुमारने आपल्या आजारी वडिलांना घेऊन तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास लॉकडाऊनमध्ये केला आहे. तिच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इवांका हिनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून या मुलीच्या धाडसाने कौतुक केले आहे. ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा १२०० किमी अंतर प्रवास केला आहे.

हेही वाचा – हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर आता ‘हे’ लोक देखील करु शकतात

- Advertisement -

इवांकाने केले ट्विट, म्हणाली…

१५ वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात १२०० किमीचे अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेने तिने भारतीयांचे तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

ज्योतीला दिल्लीतून बोलावणे आले 

ज्योतीच्या या धाडसाची सायकलिंग फेडरेशननेही दखल घेतली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी सांगितले की, ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावले आहे. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचे असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसे पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे. असं ओंकार सिंह यांनी सांगितलं आहे.

ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी तिने सायकवरून वडिलांनी नेण्याचे ठरवले. त्यासाठी सात दिवसांत तिने १२०० किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी आणले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -