घरदेश-विदेशबिहारमध्ये महिलांची सुरक्षा आता तृतीयपंथींच्या हातात

बिहारमध्ये महिलांची सुरक्षा आता तृतीयपंथींच्या हातात

Subscribe

बिहारमधील महिलांची सुरक्षा आता तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांच्या हातात असणार आहे. बिहार सरकारने हा नवा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे तृतीयपंथींनाही रोजगार मिळणार आहे.

दिवसेंदिवस बिहारमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत चालल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी बिहार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बिहार सरकार महिला आणि मुलींसाठी बनवण्यात आलेल्या गेस्ट हाऊसमध्ये आता तृतीयपंथी सुरक्षा रक्षक तैनात करणार आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने संशोधन केले होते. त्यानंतर मे महिन्यात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सद्वारे महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात बिहारच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये लैंगिक शोषणाच्या घटना वाढत असल्याचे सांगण्यात आले होते. याच अहवालनुसार हा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुझफ्फरपूरमध्ये गुन्हेगारांवर तक्रार दाखल

बिहारचे समाज कल्याण विभागाचे मुख्य सचिव अतुल प्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालामध्ये लैंगिक शोषणावर उपाययोजना सांगितल्या आहेत, ज्या अंमलात आणणे फार महत्त्वाचे आहेत. या अहवालामध्ये बऱ्याच मुलींची नावे घेण्यात आली आहेत. त्यामुळे हा अहवाल सार्वजनिकपणे लोकांना दाखवता येणार नाही. आम्ही या अहवालाच्या आधारावर अनेक लोकांवर मुजफ्फरपूरमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांना या गेस्ट हाऊसचे वेळोवेळी सोशल ऑडिट करण्यासही सांगितले आहे’.

- Advertisement -

महिला गेस्ट हाऊसमध्ये तृतीयपंथी सुरक्षा रक्षक

अतुल प्रसाद यांनी सांगितले की, ‘काही काळासाठी आम्ही महिला गेस्ट हाऊसमध्ये तृतीयपंथी सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रस्तावाला समर्थन देत हा प्रस्ताव लागू करण्याचे आदेश दिले. गेस्ट हाऊसमध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी तृतीयपंथीयांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत. हा निर्णय लैंगिक शोषणाच्या समस्येवर उपायासोबतच तृतीयपंथींना रोजगार मिळवण्यासाठी आणि सामाजिक समानतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -