Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर देश-विदेश Sushant Suicide Case: मुंबईत बिहार पोलिसांचा संमातर तपास सुरु

Sushant Suicide Case: मुंबईत बिहार पोलिसांचा संमातर तपास सुरु

सिनेदिग्दर्शकासह सीएची चौकशी होणार

Mumbai
अभिनेता सुशांत सिंग राजपूत

सिनेअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत संमातर तपासाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सिनेदिग्दर्शक महेश छाब्रा याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली तर लवकरच सुशांतच्या सीएची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणीही बिहार पोलिसांकडून वांद्रे पोलिसांकडे करण्यात आली आहे. १४ जूनला सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु असतानाच सुशांतचे वडिल कृष्ण किशोर सिंह यांनी बिहारच्या राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर रियाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांच्या चारजणांचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने दोन दिवसांपूर्वी सुशांतच्या तीन बॅकेत असलेल्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतच्या बँक खात्यातून कोणाला, कधी आणि कशासाठी पैसे देण्यात आले होते. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने परस्पर काही आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शुक्रवारी सुशांतचा मित्र आणि सिनेदिग्दर्शक महेश छाब्रा याची बिहार पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला होता. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.

शनिवारी सिनेदिग्दर्शक व लेखक रुमी जाफरी यांचीही बिहार पोलिसांनी चौकशी केल्याचे बोलले जात आहे. लवकरच सुशांतच्या सीएची पोलिसांकडून जबानी नोंदवून चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे बिहार पोलिसांनी वांद्रे पोलिसांकडे सुशांतच्या अपमृत्यूची नोंद असलेले कागदपत्रे, डायरी, शवविच्छेदन अहवालासह फॉन्सिक लॅबचा अहवालाची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयानंतर बिहार पोलिसांना संबंधित कागदपत्रे देऊन त्यांना तपास कामात सहकार्य केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


सुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here