घरताज्या घडामोडीकरोनाचा सामना करण्यासाठी बिल गेट्स देणार १० करोड डॉलर

करोनाचा सामना करण्यासाठी बिल गेट्स देणार १० करोड डॉलर

Subscribe

गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय विज्ञान आणि लस तयार करणाऱ्या लॅबसोबत काम करत आहे.

जगभरात करोनाने थैमान घातले आहे. जगभरात करोना विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे अनेक देशांनी स्वत:ला क्वॉरंटाईन केले आहे. दरम्यान, करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेट्स फाउंडेशन पुढे आले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशन करोनाचा सामना करण्यासाठी १० कोटी डॉलर देणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह वॉशिंग्टनला मदतीसाठी ५० लाख डॉलर देणार असल्याचे बिल गेट्स यांनी सांगितले.

दरम्यान, बिल गेट्स यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला शांतता राखण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर, संस्था बंद करण्यात काही गैर नाही आहे. लोक घराच्या बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होईल, असे बिल गेट्स म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आयसोलेशन, क्वॉरंटाईनमधल्या रुग्णांची चांगली काळजी घेतली जातेय – गृहमंत्री


करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाला आर्थिक नुकसान होणार आहे. याची चिंता सर्वच देशाला आहे. विकसनशील देशांमध्ये रुग्णालयांची संख्या कमी आहे. दरम्यान, गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय विज्ञान आणि लस तयार करणाऱ्या लॅबसोबत काम करत असल्याचे बिल गेट्स म्हणाले.

- Advertisement -

बिल गेट्स यांनी काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. सामाजिक कार्यासाठी वेळ मिळावा म्हणून राजीनामा दिल्याचे बिल गेट्स म्हणाले होते. बिल गेट्स यांनी राजीनामा दिला असला तरी कंपनीचे सीईओ सत्या नडेला आणि इतर अधिकाऱ्यांचे सल्लागार असणार आहेत.


हेही वाचा – इराणमध्ये अडकलेला जामखेड तालुक्यातील यात्रेकरू भारतात परतला


जगभरात करोनाने थैमान घातले आहे. जगभरात करोनाचे २ लाख २६ हजार ७५६ रुग्ण आहेत. आतापर्यंत करोनामळे ९ हजार २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चीनमधील मृतांची संख्या जास्त आहे. तर त्यापाठोपाठ इटलीमध्ये २ हजार ९७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -