अजब…! वीज ग्राहकाला पाठवले ८० खरब रुपयांचे बिल

सोशल मीडियावर नेटकरी वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षपणाचा आनंद घेत आहेत.

Singrauli

एकीकडे लॉकडाऊनमधील जनतेच्या वीज बिलात दिलासा देण्याचा दावा केला जात आहे. १०० आणि ५० रुपयांची बिले ग्राहकांना पाठविण्यात आली आहेत, अशा जाहिराती वर्तमानपत्रात दिल्या जात आहेत. सिंगरौलीमध्ये वीजखात्याने पाठविलेल्या एका महिन्याच्या बिलावरील शून्य मोजणे ग्राहकांना अवघड झाले आहे. तर सोशल मीडियावर नेटकरी वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षपणाचा आनंद घेत आहेत.

हे प्रकरण सिंगरौली जिल्ह्यातील बैढन विद्युत वितरण केंद्रतले आहे. वीज ग्राहक हा सेवानिवृत्त शिक्षक असून राम तिवारी असे त्याचे नाव आहे. वीज वितरण विभागाने त्यांना ८० खरब रुपयांचे वीजबिल पाठविले आहे. बिलाची रक्कम इतकी आहे की, ग्राहक आपली संपूर्ण मालमत्ता विकूनही ते वीजबिल भरू शकत नाही. बिल आल्यानंतर ग्राहक नाराज असून वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडे न्याय मागत आहेत.

नेटकऱ्याची प्रतिक्रिया
नेटकऱ्याची प्रतिक्रिया

दुसरीकडे सोशल मीडियावरील लोक विभागाच्या दुर्लक्षाची खिल्ली उडवत आहेत. इतके बिल हे संपूर्ण राज्याचे पण असू शकत नाही, असे लोक म्हणत आहेत. त्याचबरोबर विभागाचे अधिकारीही यावर प्रतिसाद देत नाहीत.