घरदेश-विदेश१२ दहशतवाद्यांची लिस्ट बनवून त्यांना मारण्यात यश - बिपिन रावत

१२ दहशतवाद्यांची लिस्ट बनवून त्यांना मारण्यात यश – बिपिन रावत

Subscribe

रतीय लष्कराच्या जवानांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर नवीद जट याला मारण्यात यश आले आहे. या संदर्भात भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले की, १२ दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली होती. या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सतत भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक घडत असते. बुधवारी देखील अशीच चकमक जम्मू-काश्मीरमध्ये झाली. या चकमकीत भारतीय लष्कराच्या जवानांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर नवीद जट याला मारण्यात यश आले आहे. या नवीद जटचा ‘रायझिंग काश्मीर’ या काश्मीरमधील नामांकीत वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभाग होता. या संदर्भात भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले की, १२ दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली होती. या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले बिपिन रावत?

बिपिन रावत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील लोक दहशतवाद्यांविषयी माहिती लष्कराला देत आहेत त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ऑपरेशन सतत यशस्वी होत आहे. माहिती मिळाल्यानुसार लष्कराने १२ दहशतवाद्यांची यादी बनवली होती. यादीमधील सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान देण्यात लष्कराला यश आले आहे. त्याचबरोबर आम्हाला दहशतवाद्यांच्या मोरक्यांना ठार करायचे आहे, असे रावत म्हणाले आहेत. पीओके संबंधी बोलताना रावत म्हणाले की, पाकिस्तानने धूर्तपणे पीओके, गिलगीट-बाल्टिसात्नाच्या लोकसांख्यिकीत बदल केला आहे. त्यामुळे नेमकं काश्मिरी कोण आहे, हे सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील जनतेशी सरकार भेदभाव करते, हा चुकीची आरोप आहे. तेथील युरोप भरकटतोय. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे बिपिन रावत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोस्ट वॉण्टेड दहशतवादी पंजाबमध्ये; फोटो जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -