घरदेश-विदेशराजस्थाननंतर हिमाचल प्रदेशमध्ये 'बर्ड फ्ल्यू'

राजस्थाननंतर हिमाचल प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’

Subscribe

१७०० हजार विदेशी पक्ष्यांचा मृत्यू

कोरोना संक्रमणातून दिलासा मिळत नाही तोवर देशातील हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत आणखीन एका अतिशय धोकादायक विषाणूनं डोके वर काढले आहे. बर्ड फ्ल्यूमुळे हिमाचल प्रदेशातील १७०० हजार विदेशी पक्षांचा मृत्यू झाला आहे. या पक्षांमध्ये H5N1 विषाणू आढळून आला आहे. नंतर संबंधित राज्यातील अधिकाऱ्यांकडून ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तसंच केरळमध्येही १२००० बदकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, झारखंड आणि राजस्थानातही या विषाणूसंबंधी अलर्ट जारी करण्यात आलाय. केंद्र सरकारनंही या घटनेची नोंद घेतलीय.

हिमाचल प्रदेशच्या स्थानिक प्रशासनाने मृत पक्षांचे नमुने चाचणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. यावेळी मृत पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’ आढळल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी वन विभागाने पावले उचलली असून जलाशयाच्या ठिकाणी पर्यटनाला बंदी घातली आहे.  हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यापासून ३०० किलोमीटर दूर असणाऱ्या कांगडाच्या पौंग जलाशयात दरवर्षी लाखो विदेशी पक्षी येत असतात. थंडीच्या दिवसात सायबेरिया आणि मध्य आशियात मोठ्याप्रमाणात पडणाऱ्या बर्फामुळे लाखो विदेशी पक्षी कोसो मैल प्रवास करत या ठिकाणी येतात. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचा वास्तव्यानंतर हे पक्ष पुन्हा परतीचा प्रवासाला निघतात.

- Advertisement -

मात्र यावर्षी यातील १७०० विदेशी पक्षांचा प्रवास येथील संपला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात मृत झालेल्या पक्षांमुळे जिल्हा प्रशासनाने जलाशयांशेजारील चिकन, अंडी आणि इतर पोल्ट्री उत्पादन विक्रीवर बंदी घातली आहे. पौंग जलाशयाच्या सभोवताच्या एक किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात हाय अलर्ट घोषित केला आहे. तर पर्यटकांनाही याठिकाणी येण्यास बंदी घातली आहे.


हेही वाचा – भारतात आता ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाची भीती; केंद्राचा राज्यांना अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -