घरदेश-विदेशबर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, दिल्लीत उभारली कंट्रोल रुम

बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, दिल्लीत उभारली कंट्रोल रुम

Subscribe

केद्र सरकारचा निर्णय

देशातील जवळपास सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा धोका वाढत असल्याने प्रत्येक राज्याने हाय अलर्ट घोषित केला आहे. याप्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेत केंद्र सरकारने एक कंट्रोल रुम तयार केली आहे. या कंट्रोम रुमच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्येक राज्याच्या संपर्कात राहत त्याठिकाणची सध्यस्थिती जाणून घेणार आहे. कोरोना संकट काळात देशात बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्याने नवे संकट प्रत्येक राज्यासमोर उभे राहिले आहे. मध्य प्रदेशात शेकडोंच्या संख्येने कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूचे नमुने आढळले आहेत. यापार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिस्थिती पाहता तात्काळ बैठक बोलावली आहे.

प्रत्येक राज्यातील पॉल्ट्री फॉर्ममधील पक्षांचे चाचणीसाठीचे नमुने घेतले जाणार आहेत. याबाबत राज्य सरकार लवकरात लवकर नियम जाहीर करणार आहे. केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळमध्ये मोठ्याप्रमाणात बर्ड फ्ल्यूचा घटना समोर आल्यानंतर दिल्लीत कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे.  बर्ड फ्ल्यूच्या वाढत्या घटना पाहता कर्नाटक, केरळ राज्यांच्या सीमावर अलर्ट जाहिर करण्यात आल्या. कर्नाटकच्या चार जिल्ह्य़ांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला. तसेच केरळच्या प्रभावित क्षेत्रांमध्ये पक्षांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर जवळपास १० राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -