घरताज्या घडामोडीअहमदाबाद : पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या इंजिनात आग

अहमदाबाद : पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या इंजिनात आग

Subscribe

पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या इंजिनात आग लागल्याची घटना अहमदाबाद विमानतळावर घडली आहे.

अहमदाबाद विमानतळावर आज मोठा अपघात होता होता टळला. अहमदाबात विमानतळावरुन बंगळूरला उड्डण घेतलेल्या गो एअर विमानाच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कळताच वैमानिकाने आवश्यक ती खबरदारी बाळगत विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. तसेच प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले असल्याचे गो एअरच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

गो एअर या विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरला उड्डण घेतलेल्या गो एअरच्या जी – ८ -८०२ या विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली. हे विमान पक्षाच्या किंवा एखाद्या बाहेरील पदार्थाच्या संपर्कात आल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. तसेच ही आग छोटी असल्यामुळे तातडीने विझवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आणि बेंगळुरुला जाणाऱ्या प्रवाशांसाटी दुपारी १.३० च्या सुमारास पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.


हेही वाचा – आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी जोडलं जाणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -