घरCORONA UPDATECorona: सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या धर्मगुरूंचा कोविड-१९ मुळे मृत्यू

Corona: सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या धर्मगुरूंचा कोविड-१९ मुळे मृत्यू

Subscribe

अमेरिकेतील वर्जीनियामध्ये एका ख्रिचन धर्मगुरूचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. याच धर्मगुरूने अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळांवर एकत्र जमण्यास जम्माव करण्याला विरोध दर्शवला होता.

अमेरिकेतील वर्जीनियामध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. याच धर्मगुरूने अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळांवर एकत्र जमण्यास जम्माव केला होता, तेव्हा त्याला विरोध करत, देव हा कोरोनापेक्षाही मोठा असल्याचे म्हटले होते. गेराल्ड ओ. ग्लेन असे या ६६ वर्षीय धर्मगुरूचे नाव असून त्यांना धर्मगुरू फ्रान्सिस यांनीही श्रद्धांजली दिली आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे हा देशही लॉकडाऊनच्या स्थितीत आहे.

हेही वाचा – Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज ठाकरे मैदानात; कामाचे कौतुक केले

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

धर्मगुरू गेराल्ड ग्लेन यांची पत्नी मदर मारिशिया (वय ६५) यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ग्लेन आजारी असताना त्यांचे शिक्ष्य सुश्री क्रॉले यांनी सांगितले की, माझे वडिल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य मला आहे. म्हणूनच मी लोकांनाही कोरोनापासून वाचण्यासाठीचे सर्व उपाय करण्याचे आवाहन करते. धर्मगुरू गेराल्ड ग्लेन यांनी धार्मिक स्थळांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असतानाही अनेक सभा घेतल्या. त्यांना अमेरिकेतील ज्ञानी धर्मगुरू म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी लोकं जाणीवपूर्वक ऐकतात आणि त्याचे पालनही करतात. त्यांनी चर्चमधील पुजा घरं बंद ठेवण्याच्या आदेशालाही धुडकावून लावले होते. गेल्या महिन्यातील २२ तारखेला एका सभेत धर्मगुरू ग्लेन यांनी म्हटले होते की, देव हा या कोरोनापेक्षाही मोठा आहे, असा मला ठाम विश्वास आहे. त्यामुळे मला या कोरोनाची भिती वाटत नाही. त्याच्या दिवसानंतर ३० मार्च रोजी त्यांना वर्जीनियामधील एका ठिकाणी क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -