घरदेश-विदेशहेमंत करकरे देशद्रोही; मला पकडल्यावर सव्वा महिन्यातच त्याचा अंत

हेमंत करकरे देशद्रोही; मला पकडल्यावर सव्वा महिन्यातच त्याचा अंत

Subscribe

'हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले' असल्याचे वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आणि भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

प्रज्ञा सिहं ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, हेमंत करकरे यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, मी हेमंत करकरे यांना बोलली होती की, बोलले की तुमचा सर्वनाश होईल, त्यानंतर सव्वा महिन्यातच त्यांना दहशतवाद्यांनी मारले. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

भोपाळ मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवले. पुढे त्यांनी असे सांगितेल की, “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्यांनी हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की साध्वीला सोडून दे. मात्र हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीपण करुन पुरावा घेऊन येईल मात्र साध्वीला सोडणार नाही”

- Advertisement -

पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, ‘हेमंत करकरे हे देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते. ते मला म्हणायचे की, सत्यासाठी मला देवाकडे जावे लागेल का? तर मी त्यांना बोलले होती की, तुम्हीला गरज वाटत असेल तर तुम्ही जावा’ तसंच मी त्याला म्हणाले होते की तुझा सर्वनाश होईल. त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. त्यांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतर माझे सुतक संपले’, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ते हुतात्मा झाले होते. त्यावेळी त्यांच्या बलिदानावर सर्व देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. याच हल्लयातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला नंतर फासावर लटकाविण्यात आले. तत्पूर्वी मालेगाव बॉम्बस्फोट हात असल्याच्या संशयावरून करकरे यांच्या नेतृत्वाखालील दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -