घरदेश-विदेशभाजपाची पहिली यादी जाहीर, राज्यातल्या १६ नावांची घोषणा!

भाजपाची पहिली यादी जाहीर, राज्यातल्या १६ नावांची घोषणा!

Subscribe

काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या याद्या जाहीर झाल्यानंतर भाजपाची यादी कधी जाहीर होणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. अखेर भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून पक्षातल्या दिग्गजांसोबतच अनेक नव्या चेहऱ्यांची नावं या यादीमध्ये दिसत आहेत. दिल्लीतल्या मुख्यालयात जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही नावांची घोषणा केली आहे. जवळपास २०० उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, ज्या खासदारांच्या कामगिरीचा रिपोर्ट असमाधानकारक होता, त्या खासदरांचा पत्ता कट करून त्या जागी नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पत्ता कट झालेल्यांमध्ये काही ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे.

जालना – रावसाहेब दानवे

- Advertisement -

मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी

मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन

- Advertisement -

अहमद नगर – सुजय विखे पाटील

बीड – प्रीतम मुंडे

नंदुरबार – हिना गावित

धुळे – सुभाष भामरे

रावेर – रक्षा खडसे

वर्धा – रामदास तडस

चंद्रपूर – हंसराज अहिर

भिवंडी – कपिल पाटील

सांगली – संजय काका पाटील

लातूर – सुधाकर श्रुंगारे

नागपूर – नितीन गडकरी

अकोला – संजय धोत्रे

गडचिरोली-चिमूर – अशोक नेते

वाराणसी – नरेंद्र मोदी

गांधी नगर – अमित शाह

अमेठी – स्मृती इराणी

मथुरा – हेमा मालिनी

उन्नाओ – स्वामी साक्षी महाराज

लखनौ – राजनाथ सिंह

अरुणाचल पूर्व – किरण रिजिजू

धारवाड – प्रल्हाद जोशी

बंगळुरू उत्तर – सदानंद गौडा

जयपूर ग्रामीण – राज्यवर्धन राठोड

जोधपूर – गजेंद्रसिंह शेखावत

आसनसोल(प.बं.) – बाबुल सुप्रियो

किरीट सोमय्यांचा समावेश नाही

भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरून सध्या वाद सुरू असताना आजच्या पहिल्या यादीत मात्र त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता सोमय्या यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ईशान्य मुंबईमधून ते इच्छुक आहेत. पण ‘जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात मतदान करू’ अशी भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली होती. दरम्यान याच मतदारसंघातून रेल्वे मंत्री पियुष गोयल हे देखील इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

रक्षा खडसेंना पहिल्या यादीत स्थान

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांचा देखील पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे हे नाराज असून, ते भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये देखील एकटेच दिसतात. त्यामुळे नाराज नाथाभाऊंच्या सूनबाईना पहिल्या यादीत भाजपाने स्थान दिले आहे.

लातूरमध्ये खासदाराचं तिकीट कापलं!

दरम्यान, एकीकडे अहमदनगरमध्ये आयात उमेदवार सुजय विखे पाटील यांनादेखील पहिल्या उमेदवार यादीमध्ये स्थान देण्यात आलं असताना दुसरीकडे लातूरमध्ये मात्र विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट कापलं गेलं आहे. त्यांच्या जागी सुधाकर श्रुंगारे यांना संधी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -