घरदेश-विदेशकोरोनाची लसही बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात

कोरोनाची लसही बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात

Subscribe

देशातल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कोरोनाच्या महामारीच्या निमित्ताने कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन देणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे. कोरोनाच्या काळातच बिहार निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपने कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन आपल्या संकल्प पत्र जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले आहे. त्यासोबतच १९ लाख नोकऱ्यांचे आश्वासनही देण्यात आले आहे. येत्या आठवड्यांमध्ये बिहार निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. भाजपकडून आगामी पाच वर्षांसाठी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

बिहारमध्ये २४३ जागांसाठी येत्या २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर या मतदानाचे निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होतील. एकीकडे तेजस्वी यादव यांनी १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलेले असतानाच भाजपने आपल्या जाहिरनाम्यात १९ लाख नोकऱ्या देण्याचे स्पष्ट केले आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपने विरोधी पक्षाने दिलेल्या आश्वासनाच्या दुप्पट अशा स्वरूपाचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्याच्या माध्यमातून दिले आहे. तेजस्वी यादव यांच्या सरकारी नोकऱ्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह करत नितीश कुमार यांनी हा रोजगार देण्यासाठी पैसा कुठून उभारणार असाही सवाल केला होता. राज्यातली बेरोजगारीचा मुद्दा पुढे करत राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी नोकरीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. नितीश यांच्या नेतृत्वातल्या सरकारविरोधात बेरोजगारीच्या मुद्दयावर आरजेडीने यंदा मोठी मोहीम हाती घेतली आहे. भाजपने आज जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात १९ लाख नोकऱ्यांपैकी चार लाख नोकऱ्या या शिक्षकांसाठी, एक लाख नोकऱ्या आरोग्य क्षेत्रासाठी अशा मिळून सरकारी क्षेत्रासाठी देण्यात येणार आहेत. तर उरलेल्या नोकऱ्या या आयटी हबमध्ये देण्यात येणार आहेत. त्यासोबतच अॅग्रीकल्चर हब तयार करण्याचेही आश्वासनही भाजपमार्फत देण्यात आले आहे.

- Advertisement -

सध्या जगभरात सुरू असलेल्या कोविडच्या लशीबाबतीत जगभरात प्रयोग सुरू आहेत. पण लस येण्याआधीच भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा मुद्दा हा कोविडचे लसीकरण केला आहे. जसजशी कोव्हिडची लस तयार होईल तसतशी बिहारच्या सर्व लोकांना ही लस मोफत पद्धतीने देण्यात येईल असे भाजपने स्पष्ट केले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा जाहीरनामा प्रकाशित करत आम्ही जाहीरनाम्यात लशीचा प्राधान्याने समावेश केला आहे असे स्पष्ट केले आहे.

जाहीरनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश

– १९ लाख नोकऱ्यांची संधी
– मोफत कोविडचे लसीकरण
– ३ लाख शिक्षकांची नेमणुक
– बिहारला आयटी हब बनवणे, १० लाख रोजगार निर्माण करणे
– १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणे
– ३० लाख लोकांना पक्की घरे
– ९ वी नंतरच्या मुलांसाठी मोफत टॅबलेट

- Advertisement -

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -