घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली भाजप नेता आणि भावाची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली भाजप नेता आणि भावाची हत्या

Subscribe

भाजपचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भाऊ अजित परिहार यांची दहशतवाद्यांनी रात्री ८ वाजता गोळ्या झाडून हत्या केली. या हत्या प्रकरणानंतर किश्तवाडामध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळावर कर्फ्यू लागू केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेता आणि त्यांच्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडामध्ये रात्री ८ वाजता ही घटना घडली आहे. भाजपचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भाऊ अजित परिहार यांची दहशतवाद्यांनी रात्री ८ वाजता गोळ्या झाडून हत्या केली. दोघेही जण आपल्या दुकानावरुन घरी येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर किश्तवाडामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजप नेत्यांची निर्घृण हत्या

गुरुवारी रात्री भाजपचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भाऊ अजित परिहार दुकान बंद करुन घरी जात होते. अनिल परिहार यांची वाट पाहत बसलेल्या दहशतवाद्यांनी ते येताच त्याच्यावर आणि त्यांच्या भावावर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या हत्येनंतर किश्तवाडामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

गृहमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप नेता अनिल परिहार आणि त्यांच्या भावाच्या हत्या प्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. आरोपींना अटक करण्यामध्ये पोलिसांनी कोणतिही कसर सोडू नये. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरचे प्रदेश भाजपा नेता अनिल परिहार आणि त्यांच्या भावाच्या हत्येची माहिती कळताच दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपालांशी फोनवरुन चर्चा करुन घटनेचे माहिती घेतली.

स्थानिकांनी केले आंदोलन

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे घटनास्थळावर पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. घटनास्थळावर कायदा सुव्यवस्थेसाठी जवानांना बोलावले गेले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तसंच परिसरामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. या हत्येमुळे किश्तवाडामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -