घरदेश-विदेशभाजप नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट

Subscribe

अर्ध्यातासापासून सुरु होतं खलबतं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भाजपा नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडल्या नंतर आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतली. अचानक घेतलेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. परंतु भाजपा नेते आशिष शेलार यांनी भेटीमागचे कारण सांगितले आहे.तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि मराठा आरक्षणाविषयी योग्य ती कायदेशीर पावलं उचलावीत. याबाबतही शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांची भेट घेतल्यामागील कारण आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. आशिष शेलार यांनी असे म्हटले आहे की, या भेटीदरम्यान मराठा आरक्षण प्रकरणी चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण प्रकरणी मराठा समाजाच्या भावना शरद पवारांना माहिती आहेत. या भावना अतिशय तीव्र आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना या विषयाचं गांभीर्यही शरद पवारांना माहिती आहे. असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीतही मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली असल्याचे समजले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. यानंतर विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलाच्याबाबत चर्चा झाल्याचेही समजते आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. असे पत्र त्यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -