घरदेश-विदेशभाजप नेत्यानं 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे प्लॅन रचून केला प्रेयसीचा खून

भाजप नेत्यानं ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे प्लॅन रचून केला प्रेयसीचा खून

Subscribe

'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे प्लॅन रचून इंदौरमधील भाजप नेत्यानं २२ वर्षाच्या तरूणीची हत्या केली आहे. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची बाब आता पोलीस तपासाअंती उघड झाली आहे.

‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे प्लॅन रचून इंदौरमधील भाजप नेत्यानं २२ वर्षाच्या तरूणीची हत्या केली आहे. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची बाब आता पोलीस तपासाअंती उघड झाली आहे. टि्ंवकल डागरे असं २२ वर्षीय काँग्रेस नेत्याचं नाव आहे. तीन वर्षापूर्वी टि्ंवकल डागरेची हत्या करण्यात आली होती. भाजपचे नेते जगदीश करोतिया वय वर्षे ६५  उर्फ कल्लू पैलवान आणि त्याच्या कुटुंबियांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. टि्ंवकल आणि जगदीश यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे. दृश्यम चित्रपट पाहून टि्ंवकल डागरेच्या हत्येचा कट रचला गेला. टि्ंवकल डागरे हत्या प्रकरणामध्ये जगदीश करोतियासहल त्याची तीन मुलं आणि मुलांच्या मित्राचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे.

जगदीश आणि ट्विकलमध्ये होते प्रेमसंबंध

जगदीश आणि ट्विकलमध्ये प्रेम संबंध होते. पण, या प्रेमाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. ट्विकलला जगदीश सोबत लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहायचे होते. पण, त्यामुळे जगदीशच्या राजकीय कारकीर्दीला सुरूंग लागणार होता. जगदीशनं ट्विकलला ही बाब अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न देखील केला. पण, त्याचा काहीही परिणाम ट्विकलवर झाला नाही. अखेर ट्विकलच्या हत्येचा कट रचला गेला. त्यानंतर जगदीशनं ट्विकलला एकत्र राहण्यास तयार असल्याचा बनाव रचला. त्यासाठी ‘नवीन घर पाहण्यास ये’ असा निरोप देखील पाठवला. ठरल्याप्रमाणे जगदीश करोतिया आणि त्यांच्या तीन मुलांनी मिळून ट्विकलचा खून केला. यामध्ये विजय वय वर्षे ३८, अजय वय वर्षे ३६, विनय वय वर्षे ३१ आणि एक मित्र निलश कश्यप वय वर्षे २८ या चार जणांचा देखील सहभाग आहे.

- Advertisement -

कशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

ट्विकलला शेतात बोलवून मारझोड करून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीमध्ये कोंबून घरांसाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेण्यात आला. त्याठिकाणी मजूरांना कुत्रा गाडण्यासाठी खड्डा खोदा असं सांगण्यात आलं. तिथेच तिचा मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर ट्विकलच्या मृतदेहची राख नाल्यात फेकून देण्यात आली. तर, ट्विकलचा मोबाईल हा तिच्या होणाऱ्या पतीच्या घराजवळ फेकण्यात आला. पण, तीन वर्षानंतर का असेना साऱ्या प्रकरणाचं बिंग फुटलं.

वाचा – आजोबांच्या शेजारीच नातवाचा मृतदेह, गूढ काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -