घरदेश-विदेशहरियाणात भाजप महिला नेत्याची हत्या; चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच झाडली गोळी!

हरियाणात भाजप महिला नेत्याची हत्या; चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच झाडली गोळी!

Subscribe

हरियाणामधील गुरूग्राममध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येचा आरोप तीच्या पतीवर करण्यात आला आहे. कारण या महिलेच्या हत्येनंतर तीचा पती आरोपी फरार आहे. या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत महिला मुनेश भाजपा किसान मार्चाची पदाधिकारी होती. त्याचप्रमाणे सध्या भाजपा पार्टीच्या किसान मोर्चाची महामंत्री पदावर होती. मुनेश राजकारणात असल्यामुळे सतत बाहेर असणं आणि अनेक लोकांशी भेटी गाठी तीच्या होत असे. पण तीचे पती सुनील गोदारा यांना हे मुनेशचे वागणे मान्य नव्हतं.

- Advertisement -

अनेकवेळा सुनील यांनी मुनेशवर संशय घेतला. शनिवारी रात्री साडे नऊ वाजता मुनेश तीच्या बहिणीशी व्हीडिओ कॉलवर बोलत होती. यावेळी सुनील घरी आला त्याला या गोष्टीचा राग आला. यावेळी सुनील आणि मुनेशमध्ये वाद झाला. यावेळी सुनीलने आपली रिव्हॉलवर काढली आणि पत्नी मुनेशवर गोळी झाडली. सुनीलने झाडलेल्या दोन्ही गोळ्या मुनेशच्या छातीत लागल्या आणि त्यात तीचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मरणा आधी मुनेशने बहिणीला कॉल करत सुनीलने आपल्यावर गोळी झाडल्याचे सांगितले. पण बहिण मुनेशच्या घरी पोहचण्या आगोदरच मुनेशचा मृत्यू झाला होता. पोलिससध्या अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -