घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir: 'स्वप्न साकारतंय; ‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’ क्षण'- आडवाणी

Ayodhya Ram Mandir: ‘स्वप्न साकारतंय; ‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’ क्षण’- आडवाणी

Subscribe

"राम मंदिर भारताचे सशक्त, संपन्न आणि स्नेहपुर्ण राज्य म्हणून प्रतिनिधित्व करेल. जेथे सर्वांना न्याय मिळेल व कोणीही वेगळे नसेल."

आज बुधवारी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येत बुधवारी होत असलेल्या राम मंदिर भूमीपूजनापूर्वी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

ते म्हणाले, मझ्या मनातील स्वप्न पूर्ण होत आहे. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक असणार आहे.  लालकृष्ण आडवाणी हा संदेश जारी करत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे राम मंदिराची पायाभरणी करणे हा केवळ माझ्याच नाही तर सर्वच भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस आहे. राम मंदिर भारताचे सशक्त, संपन्न आणि स्नेहपुर्ण राज्य म्हणून प्रतिनिधित्व करेल. जेथे सर्वांना न्याय मिळेल व कोणीही वेगळे नसेल.

- Advertisement -

आडवाणी म्हणाले की, आयुष्यातील काही स्वप्ने पुर्ण होण्यासाठी खूप वेळ घेतात. मात्र जेव्हा ती पुर्ण होतात, त्यावेळी प्रतिक्षा सार्थकी लागली असे वाटते. असेच एक स्वप्न जे माझ्या ह्रदयाजवळ आहे, आज ते पुर्ण होत आहे. राम जन्मभूमिवर रामाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचे भाजपचे स्वप्न होते व मिशन देखील. नियतीने १९९० मध्ये रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान सोमनाथ ते अयोध्येपर्यंत राम रथयात्रा घडवली हे मी भाग्य समजतो. या यात्रेने असंख्य लोकांची आकांक्षा, उर्जा आणि इच्छा प्रेरित केली.

- Advertisement -

आडवाणी म्हणाले, कधी-कधी एखाद्याच्या जीवनात महत्वाचे स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ लागतो. मात्र, जेव्हा शेवटी त्याला समजते, तेव्हा प्रतीक्षा सार्थक होते. असेच एक स्वप्न, माझ्या हृदयाजवळ आहे, जे आता पूर्ण होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी भूमीपूजन करत आहेत. खरे तर हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठीच ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस आहे. एवढेच नाही, तर राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणे हे भारतीय जनता पक्षाचे मिशन राहिले आहे, असेही आडवाणी म्हणाले.

मला विश्वास आहे की राममंदिर भारताला शक्तिशाली, समृद्ध आणि शांततापूर्ण देश म्हणून प्रतिनिधित्व करेल. जेथे सर्वांना न्याय मिळेल व कोणलाही बहिष्कृत केले जाणार नाही. जेणेकरून आपण रामराज्याकडे अग्रेसर होऊ, जे सुशासनाचे प्रतिक आहे, असेही ते म्हणाले.


Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या सीमा सील; मोदींच्या कार्यक्रमापर्यंत कडेकोट सुरक्षा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -