स्वत:च्या मालकीच्या लॉ कॉलेजातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना एसआयटीकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज, शुक्रवारी सकाळी स्वामी चिन्मयानंद यांना ताब्यात घेतले आहे. एसआयटीच्या पथकाने आज सकाळी मुमुक्षू आश्रमातून चिन्मयानंद यांना अटक केली. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून आजच कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
UP DGP OP Singh: On direction of SC we had constituted and SIT team and after a probe we arrested Swami Chinmayanand from his ashram and he has been sent to jail. There has been no delay in the case. We have also arrested 3 ppl over extortion threats to Swami Chinmayanand https://t.co/d8zfRm0f7K pic.twitter.com/a9FQyMoKTq
— ANI UP (@ANINewsUP) September 20, 2019
शहाजहांपूर येथे चिन्मयानंद यांचे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मोठा राजकीय गदारोळ झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनेही माघार न घेता या संदर्भातील अनेक पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्या आधारे चिन्मयानंद यांना अटक करण्याची मागणी वारंवार होऊ लागली. तसेच चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकीही पीडित मुलीने दिली होती. हे प्रकरण चिघळणार असे दिसताच अखरे चिन्मयानंद यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली.