घरदेश-विदेश'प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर, राजकीय कर्तृत्व नाही'

‘प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर, राजकीय कर्तृत्व नाही’

Subscribe

'प्रियंका गांधी या फक्त दिसायला सुंदर असून त्यांच्याकडे राजकीय कर्तृत्व नाही', असे भाजप नेते विनोद नारायण झा म्हणाले आहेत.

प्रियंका गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. प्रियंका गांधी यांच्या या नियुक्तीवरव राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशासंदर्भात बिहारचे मंत्री आणि भाजप नेते विनोद नारायण झा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘प्रियंका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत. परंतु, त्याआधारे मत मिळत नाही. त्यांच्याकडे राजकीय कतृत्व नाही’, असे झा म्हणाले आहेत.

‘प्रियंका यांच्या पतीचा भूखंड घोटाळ्यात समावेश’

विनोद नारायण झा यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘प्रियंका फक्त दिसायला सुंदर आहेत. परंतु, त्याआधारे मत मिळत नाही. मत मिळवण्यासाठी राजकीय नेतृत्वाची गरज असते. प्रियंका या रॉबर्ट वढेरा यांच्या पत्नी आहेत. रॉबर्ट वढेरा यांचा भूखंड घोटाळ्यात समावेश आहे’. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काॅंग्रेसची नवी रणनीति 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवी रणनीति आखत आहे. प्रियंका गांधी यांना देण्यात आलेले सरचिटणीसपद त्याचाच एक भाग आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस चांगलीच तयारी करत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रसे जाहिरनामा देखील बनवत आहे. या जाहिरनाम्यामध्ये शेतकरी हिताचे आणि रोजगारासंबंधीत महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर रघुराम राजन यांनी आर्थिक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये सामील करुन घेणार आहे.


हेही वाचा – प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -