घरताज्या घडामोडीभाजप आमदाराचा सापडला मृतदेह; पक्षात खळबळ!

भाजप आमदाराचा सापडला मृतदेह; पक्षात खळबळ!

Subscribe

विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या एका आमदाराचा मृतदेह सापडल्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या असल्याचा जरी प्राथमिक अंदाज असला, तरी ही हत्या असल्याचा दावा स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूरमधल्या हेमताबादचे भाजप आमदार देवेंद्रनाथ रे यांचा सोमवारी मृतदेह सापडला. अवघ्या वर्षभरापूर्वीच भारतीय कम्युनिस्ट पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या देवेंद्रनाथ रे यांची हत्या झाल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देवेंद्र यांना आधी मारलं असून त्यानंतर ती आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -