घरक्रीडाPulwama attack : 'सानिया मिर्झालाही हटवा'

Pulwama attack : ‘सानिया मिर्झालाही हटवा’

Subscribe

भाजपचे आमदार राजा सिंह यांनी टेनिसपटू सानिया मिर्झाला 'पाकिस्तानची सून' असे यावेळी संबोधले.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकरांवर बंदीची मागणी होत असताना, दुसरीकडे टेनिसपटू सानिया मिर्झालाही हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरुन हटवा’, अशी मागणी भाजपचे आमदार राजा सिंह यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमदार सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे ही मागणी करतेवेळी, सानियाला ‘पाकिस्तानची सून’ असे संबोधले. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेने स्विकारली असून, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. याच धर्तीवर ‘सानिया मिर्झा ही पाकिस्तानची सून आहे त्यामुळे तेलंगणा ब्रँड अॅम्बेसिडरच्या पदावरुन त्वरित खाली खेचावे’, अशी मागणी भाजप आमदार सिंह यांनी केली आहे. राजा सिंह हे तेलंगणा विधानसभेतील एकमेव भाजपचे आमदार आहेत.

काय म्हणाले राजा सिंह?

”तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरुन सानिया मिर्झाला हटवण्यात यावे. तिच्याजागी सायना नेहवाल अथवा पी.व्ही. सिंधूसारख्या खेळाडूंची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली जावी.”  २०१४ साली तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नेमले होते. मात्र, सुरुवातीपासूनच सानियाच्या नावाला आणि निवडीला भाजपकडून विरोध केला गेला.

- Advertisement -

सानियाची परखड प्रतिक्रिया

या मुद्द्यावरुन सानियाला इंटरनेटवर ट्रोल करणाऱ्यांचा तिने परखड शब्दांत समाचार घेतला आहे. सानियाने याविषयी ट्वीट करत पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. मात्र, दुसरीकडे नेटिझन्सना खडसावतावा ती म्हणालीये की, ‘मला अन्य सेलिब्रिटींप्रमाणे देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावरुन जाहीर पोस्ट करण्याची गरज नाही. मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी इन्स्टाग्राम किंवा ट्वीटरची गरज नाही. मात्र, त्यामुळे मला पुलवामा हल्ल्याविषयी काही वाटत नाही असं नाही. मी सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. मात्र, जे लोक स्वतः नैराश्याने ग्रासलेले असतात ते सेलिब्रिटींना मुद्दाम टार्गेट करतात.’, अशी प्रतिक्रिया सानियाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -