घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसींचे बाबासाहेब आंबेडकर - भाजप खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसींचे बाबासाहेब आंबेडकर – भाजप खासदार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी वर्गाचे बाबासाहेब आंबेडकर आहेत, असं विधान भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केलं आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेल्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा १० वर्षांची मुदतवाढ देण्याचं विधेयक संसदेत मंजूर करण्यात आलं. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र भाजपकडून ओबीसी वर्गावर अन्याय होत असल्याची टीका भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. ‘देशातल्या ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केलं आहे. मोदी हे ओबीसी वर्गाचे बाबासाहेब आंबेडकर आहेत’, असं विधान अमर साबळे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हे विधान केलं.

१० वर्ष मुदतवाढ

घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी दिलेलं आरक्षण फक्त १० वर्षांसाठीच असू शकतं. पण त्यानंतर ते पुढे १० वर्षांसाठी वाढवता येऊ शकेल. त्याप्रमाणे येत्या जानेवारी महिन्यामध्ये या आरक्षणाची मुदत संपणार होती. म्हणूनच संसदेमध्ये ती पुन्हा १० वर्षांनी वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘ओबीसी वर्ग भाजपच्या वोटबँकेत महत्त्वाचा’

दरम्यान, यावेळी ओबीसींविषयी अमर साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी भाजप सरकारचं समर्थन केलं. ‘भाजप ओबीसींवर अन्याय करत असल्याची टीका होत आहे. पण ओबीसींसाठी मोदी हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी त्यांना संवैधानिक अधिकार देणं गरजेचं होतं. ते काम मोदींनी केलं. ओबीसी वर्गामध्ये असंतोष नाही. किरकोळ कारणावरून नाराजी असू शकते. पण महाराष्ट्रात ओबीसींनी डावललं जात नाही. भाजपच्या वोटबँकेत ओबीसी आणि एससी-एसटी महत्त्वाचे घटक राहिले आहेत. मराठा आरक्षणातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यायाची भूमिका घेतली होती. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, पण त्याचा अर्थ ओबीसी वर्गावर अन्याय केला असा अजिबात नाही’, असं साबळे यावेळी म्हणाले.


VIDEO – ओबीसी नेते भाजपविरोधात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -