प्रियांका मतदारसंघात साडी, तर दिल्लीत जीन्स घालतात – हरीश द्विवेदी

ज्याप्रमाणे राहुल गांधी आजवर अपयशी ठरले आहेत, त्याचप्रमाणे प्रियांकाही अपयशीच ठरतील' असं वक्तव्य भाजप खासदार हरिश द्विवेदी यांनी केलं आहे.

Mumbai
BJP mp harish dwivedi made comment on her appearance
काँग्रेसच्या प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून याविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावर काही जणांनी टीका केली आहे, तर काही जणांनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशचे भाजप खासदार 

प्रियांका गांधींवर खोचक टीका

यावेळी माध्यमांशी बोलताना द्विवेदी म्हणाले, ‘आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे की प्रियांका दिल्लीमध्ये जीन्स घालतात. तर, मतदार संघात फिरताना साडी नेसतात आणि कुंकू लावतात.’ द्विवेदी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवा वाद सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी खोचक टीका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मतदार संघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांना ‘रावण’ तर, प्रियांका गांधींना ‘शूर्पणखा’ असं संबोधलं होतं. तर, कैलाश विजयवर्गीय यांनी प्रियांका यांना ‘चॉकलेटी फेस’ अशी उपमा दिली होती. याशिवाय ‘सुंदर चेहऱ्याने निवडणूक जिंकता येत नाही,’ अशी खोचक टीकाही प्रियांका यांच्यावर करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here