Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बलात्कार पीडितेची ओळख फेसबुकवर केली सार्वजनिक; भाजप खासदाराचा प्रताप

बलात्कार पीडितेची ओळख फेसबुकवर केली सार्वजनिक; भाजप खासदाराचा प्रताप

Related Story

- Advertisement -

बलात्कार पीडितेचं नाव फेसूकवर व्हायरल करण्याचा संतापजनक प्रताप भाजपच्या खासदार रिती पाठक यांनी केला आहे. यावरुन आता रिती पाठक टीकेच्या धनी झाल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना घडली. पीडित महिलेची ओळख रिती पाठक यांनी फेसबुकवर उघड केली. यामुळे आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.

मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यात एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडित महिलवर लोखंडी रॉडनेही अत्याचार केले. दरम्यान, पीडितेची प्रकृचती नाजूक असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजप खासदार रिती पाठक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. भेटीचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले. त्यावर माहिती देताना त्यांनी पीडित महिलेचं नाव घेत भीषण बलात्काराबद्दल लिहिलं. अजून पोस्ट तशीच फेसबुकवर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार, बलात्कार पीडित व्यक्तीची ओळख सार्वजनिक करता येतनाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांना तिलांजली देत भाजपच्या खासदार रिती पाठक ही ओळख सार्वजनिक केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -