घरदेश-विदेशअमित शहांना स्वाईन फ्ल्यू; एम्स रुग्णालयात उपचार सुरु

अमित शहांना स्वाईन फ्ल्यू; एम्स रुग्णालयात उपचार सुरु

Subscribe

येत्या २० जानेवारीला भाजपची पश्चिम बंगालमध्ये सभा होणार आहे. या सभेला अमित शहा संबोधित करणार आहेत. अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांवर २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करम्यात आले आहे. एम्स रुग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखित त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्वत: अमित शहा यांनी स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, ‘मला स्वाईन फ्ल्यू झाला आहे. माझ्यावर उपचार सुरु आहे. ईश्वराच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच बरा होईल.’

- Advertisement -

ट्विटरवर बरे होण्यासाठी प्रार्थना

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, बिहारचे लोकसभा खासदार रामकृपाल यादव आणि राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी अमित शहा यांना लवकर बरे व्हावेत यांसाठी प्रार्थना केली आहे. राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘अमितजी तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल अशी मी प्रार्थना करतो.’ तर रामकृपाल यादव यांनी देखील ट्विट करत ‘तुम्ही लवकर बरे व्हाल अशी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे’.

भाजपची पश्चिम बंगालमध्ये सभा 

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाजपच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी अमित शहा यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना एम्स रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३०१ मध्ये दाखल करण्यात आले आहे. येत्या २० जानेवारीला भाजपची पश्चिम बंगालमध्ये सभा होणार आहे. या सभेला अमित शहा संबोधित करणार आहेत. अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांवर २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

अमित शहा प्रियकर तर उध्दव ठाकरे प्रेयसी; युती होणारच : प्रकाश आंबेडकर

शिवसेनेसमोर झुकणार नाही – अमित शहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -