भाजप नेत्याची काँग्रेसवर टीका; म्हणाले, ‘आता राहुल गांधी नव्हे तर लाहोरी म्हणा’

कोरोना परिस्थिती तसेच अर्थव्यवस्थेच्या झालेल्या घसरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींविरोधात आक्रमक होत टीका केली होती. ही टीका करताना राहुल गांधींनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपाने राहुल गांधींना प्रत्युत्तर करत त्यांच्यासाठी राहुल लाहोरी असा उल्लेख केला आहे.

भाजप नेत्याने लगावला टोला 

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, भारताने राहुल गांधी यांचे नावं बदलले आहे. ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा विषय भाजपा व काँग्रेस असा नाही आहे. हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे? भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदाने जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे, असं म्हणता. याच वेगानं काम सुरू राहिले, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल.

काय म्हणाले होते राहुल गांधी

भारतातील गरीब भुकेला आहे, कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे. भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला होता.

हेही वाचा –

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण