घरदेश-विदेशसाध्वी प्रज्ञा यांचा भाजपात प्रवेश; भोपाळमधून दिली उमेदवारी

साध्वी प्रज्ञा यांचा भाजपात प्रवेश; भोपाळमधून दिली उमेदवारी

Subscribe

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून दिली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. आज, सकाळी साध्वी प्रज्ञाने भाजपच्या भोपाळ येथील कार्यालयात जावून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीनंतर भाजप साध्वी प्रज्ञाला भोपाळ मतदारसंघासाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

- Advertisement -

साध्वी प्रज्ञाचा भाजपमध्ये प्रवेश

साध्वी प्रज्ञाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी साध्वी प्रज्ञाने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपचे ज्येष्ठ संघटक मंत्री रामलाल आणि राज्यसभेचे खासदार प्रभात झा यांची भेट घेतली. एक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजप साध्वी प्रज्ञाकडे पाहत आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजप साध्वी प्रज्ञाला लोकसभा निवडणुकीसाठी भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

कोण आहे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर?

२००८ साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकुर चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्या नऊ वर्षांपासून तुरुंगात होत्या. सध्या जामीनावर त्यांची सुटका झाली आहे. साध्वी यांच्याकडे भाषणाचे चांगले कौशल्य आहे. २००७ साली आरएसएस प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्याकांड प्रकरणी त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, कोर्टात त्यांची निर्दोष सुटका झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -