हिमाचल प्रदेश -भाजपचा बालेकिल्ला भेदणे कठीण

Mumbai

हिमाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. हिमाचल प्रदेश हे छोटे राज्य असून तेथे लोकसभेच्या केवळ ४ जागा आहेत. येथे भाजप सत्तेत असून राज्याच्या राजकारणावर या पक्षाचा प्रभाव दिसून येतो. काँग्रेसची या राज्यावरील पकड ढिली झाली आहे. आता तर परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसकडे ताकदवान नेताही नाही. यावेळी हिमाचल प्रदेशात काँग्रेस, भाजपला किती टक्कर देणार इतकाच प्रश्न आहे.

२०१४ सालच्या मोदी लाटेत या राज्यातील चारही जागा भाजपने मिळवल्या होत्या. डोंगराळ आणि निसर्गाने लयलूट केलेल्या या राज्यात लोकांना दैनंदिन जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे राज्यात नोकर्‍या, दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणार्‍या पक्षाच्या मागे हिमाचल प्रदेशची जनता रहाते, हा इथला इतिहास आहे. ओपिनयन पोलनुसार, यावेळी हिमाचल प्रदेशमधून भाजपला ३ तर काँग्रेसला १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसे झाले तर या राज्यात भाजप एक जागा गमावणार आहे.

२०१४ सालचे बलाबल
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सर्वच्या सर्व चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला ५३.८ टक्के तर काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती.

हिमाचल प्रदेशमधील मतदार संघ
१ -शिमला, २ -कांगडा, ३ -मंडी, ४ -हमीरपूर

मतदार
हिमाचल प्रदेशात ५१ लाख ५४ हजार ८५४ एकूण मतदार आहेत. त्यापैकी २८ लाख २२ हजार ५२४ मतदार पुरुष असून २३ लाख ३२ हजार ३३० मतदार या महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here