घरदेश-विदेशमुरादाबादमध्ये भाजपकार्यकर्त्यांची गुंडागिरी; निवडणूक कर्मचाऱ्याला केली मारहाण

मुरादाबादमध्ये भाजपकार्यकर्त्यांची गुंडागिरी; निवडणूक कर्मचाऱ्याला केली मारहाण

Subscribe

मुरादाबाद येथील मतदान केंद्र क्रमांक २३१ वर उपस्थित असलेला निवडणूक कर्मचारी समाजवादी पार्टीच्या सायकल या चिन्हासमोरील बटन दाबा असे मतदाराना सांगत होता

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये मतदान प्रक्रियेवेळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुरादाबाद येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘मतदान केंद्र क्रमांक २३१ वर उपस्थित असलेला निवडणूक कर्मचारी समाजवादी पार्टीच्या सायकल या चिन्हासमोरील बटन दाबा असे मतदाराना सांगत होता.’

- Advertisement -

मुरादाबाद येथे झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये निवडणूक कर्मचाऱ्याला काही लोकं मारहाण करताना दिसत आहे. तसंच भाजपच्या या कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्याचा शर्ट देखील फाडला असल्याचे दिसत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, हा निवडणूक अधिकारी मतदारांना सायकल म्हणजे समाजवादी पार्टीच्या चिन्हाला मतदान करा असे सांगत होता. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तावडीतून निवडणूक कर्मचाऱ्याची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर कोणी अशा प्रकारे कोणाला मतदान करा असे सांगितले असेल तर त्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे केली पाहिजे. मात्र अशाप्रकारे निवडणूक कर्मचाऱ्याला मतदान केंद्रावरुन खेचून बाहेर आणून त्याला मारहाण करणे हे चूक आहे. सध्या पोलिसांनी मोहम्मद जुबेर याला मतदान केंद्रावरुन काढून टाकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -