घरदेश-विदेशगौतम गंभीर लोकसभेच्या 'पिचवर'; भाजपकडून उमेदवारी

गौतम गंभीर लोकसभेच्या ‘पिचवर’; भाजपकडून उमेदवारी

Subscribe

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर आता राजकारणाच्या पिचवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आज अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

- Advertisement -

पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे.पी. नड्डा यांनी दिल्लीतील दोन उमेदवारांची आज घोषणा केली. त्यात पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरला तर मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -