घरदेश-विदेशओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Subscribe

भाजपचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्‍यांनी आज, बुधवारी एनडीएचे उमेदवार म्हणून सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्‍यानंतर सर्व पक्षांनी त्‍याच्या निवडीला पाठिंबा दिला. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्विकारला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बिर्ला यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांचे अभिनंदन केले. ओम बिर्ला हे आता १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष असतील.

- Advertisement -

कोण आहेत ओम बिर्ला

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. विरेंद्रकुमार यांनी ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार दिला. एका सर्वसामान्य कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनांपासून चळवळीत जोडलेला कार्यकर्ता ते लोकसभा अध्यक्ष असा ओम बिर्ला यांचा प्रवास असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -