घरदेश-विदेशइस्लामाबादमध्ये स्फोट; जैश–ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू?

इस्लामाबादमध्ये स्फोट; जैश–ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू?

Subscribe

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येते सैन्याच्या रुग्णालयामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून या स्फोटात जैश– ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येते सैन्याच्या रुग्णालयामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटावेळी रुग्णालयामध्ये जागतिक संघटनेने दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश – ए – मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर देखील उपचारासाठी दाखल होता. त्यामुळे या स्फोटामध्ये दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत काही माहिती मिळालेली नाही. तसेच स्फोटात जखमी आणि मृत झालेली आकडेवारी अधिकृतरित्या समोर आलेली नाही. मात्र, पाकिस्तानी सूत्रांनुसार कमीत कमी १६ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

 

यामुळे झाला स्फोट

या स्फोटाविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, काहींनी हा स्फोट पॅस पाईपलाइन लिकेज झाल्याने हा स्फोट घडला असावा पण पाकिस्तानाकडून दुजोरा आला नाही. पाकिस्तान सेना मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे सैन्याचे रुग्णालय आहे. मात्र, पाकिस्तान सरकारकडून मिडियाला स्फोटाचे वृत्तांकन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मसूज अजहरबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र सोशल मिडीयावर स्फोटाशी जोडलेले अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

ऑक्टोबर २०१७ मध्ये देखील बलूचिस्तान या प्रांतात सूफी दर्गाहजवळ आत्माघाती स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता तर २८ जण गंभीर जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -