‘ओ’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा धोका कमी – नवा खुलासा

Blood group O less likely to contract coronavirus infection than any other blood type | Study
'ओ' रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा धोका कमी - नवा खुलासा

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जगात ११ लाखांहून अधिक रुग्णांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. यादरम्यान अनेक नवे खुलासे होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका कमी आहे असे समोर आले आहे. पण जर ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याच्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता देखील कमी होते.

ब्लड एडवांसेज या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, ‘ओ रक्तगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.’ संशोधक आणि युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न डेनमार्कचे टोर्बन बॅरंगटन यांनी सांगितले की, सध्या त्याच्या देशातील स्थिती वेगळी आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी ४.७३ लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी केली. या अभ्यासात असे समोर आले की, यामध्ये जितके लोक कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यांच्यामध्ये ओ रक्तगट असलेले लोक खूप कमी होते. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये ए, बी आणि एबी रक्तगटाची संख्या जास्त होती.

ए, बी आणि एबी रक्तगटांमधील संसर्ग यामधील फरक संशोधक शोधू शकले नाहीत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जर ए आणि एबी रक्तगटातील लोकांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात.


हेही वाचा – कोरोनावर गोमूत्र प्या, असा सल्ला देणार भाजपाचे नेते कोरोना पॉझिटिव्ह